शुक्रवारी संध्याकाळी मोठा निर्णय घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. यानंतर, आणखी एक निर्णय घेण्यात आला ज्यानुसार टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. (Australian Team Tour in India) पुढील महिन्यात हा दौरा होणार असून त्यात कांगारू संघ भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध पाच टी-20 सामने (T20 Series) खेळणार आहे. आगामी महिला टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची ठरू शकते.

पहा संपुर्ण वेळापत्रक

पहिला टी-20 - 9 डिसेंबर, डी वाय पाटील स्टेडियम - नवी मुंबई

दुसरी टी-20 - 11 डिसेंबर, डी वाय पाटील स्टेडियम - नवी मुंबई

तिसरा टी-20 - 14 डिसेंबर, ब्रेबॉर्न स्टेडियम - मुंबई

चौथा टी-20 - 17 डिसेंबर, ब्रेबॉर्न स्टेडियम - मुंबई

पाचवी टी-20 - 20 डिसेंबर, ब्रेबॉर्न स्टेडियम - मुंबई

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)