जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2023) आयपीएल 2023 नंतर खेळवला जाणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाशी भिडणार आहे. गेल्या वेळी याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झालेल्या टीम इंडियाला यंदा ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद पटकावण्याची इच्छा आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या मोठ्या सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. भारत दौऱ्यावर पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर मायदेशी परतलेल्या पॅट कमिन्सने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघात प्रवेश केला आहे. हा खेळाडू WTC फायनलमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर हा संघ अॅशेस मालिकेत इंग्लंडशी भिडणार आहे. संघाचे उपकर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आहे. स्मिथने अलीकडेच भारत दौऱ्यावर दोन सामन्यांसाठी संघाची धुरा सांभाळली होती.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, टॉड मर्फी , मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.
Australia have named their squad for the WTC Final and first two Ashes Tests!#WTCFinal #Ashes
— cricket.com.au (@cricketcomau) April 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)