अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाशी सामना झाला. दोन्ही संघांमधील हा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 43 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 81.3 षटकात 327 धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 155 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. याआधी दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पाचव्या दिवशी खेळाचा निर्णय झाला. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 279 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाला एकूण 370 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य मिळाले होते. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा संघ 325 धावांवर बाद झाला.
Australia have taken a 2-0 lead in the Ashes.
Sheer dominance of Australia in the Ashes away from home, what a unit! pic.twitter.com/0ah9dDw8dJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)