ENG vs AUS ICC World Cup 2023 Live Score Update: ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध 286 धावांवरच मर्यादित, मार्नस लॅबुशेनचे अर्धशतक
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात 286 धावांवर गारद झाला.
विश्वचषकाच्या 36व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडचे आव्हान (ENG vs AUS) आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात 286 धावांवर गारद झाला. इंग्लंडला विजयासाठी 287 धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी स्टार फलंदाज मार्नस लॅबुशेनने 71 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 50 षटकात 287 धावा करायच्या आहेत.
Chris Woakes' fourth wicket ends the innings!
Have Australia got enough on the board?https://t.co/JIh6Llcs6C | #ENGvAUS | #CWC23 pic.twitter.com/fpxOhm0uuR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2023 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

