आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 41 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका (NZ vs SL) यांच्यात बेंगळुरू येथे खेळला जात आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. या स्पर्धेत न्यूझीलंडने 8 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. न्यूझीलंडचे 8 गुण आहेत. श्रीलंकेचा संघ बाहेर पडला आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाला पाचवा मोठा धक्का बसला. सलामीवीर कुसल परेरा 51 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 91/5 आहे.
Wickets fell quickly in front of him, but Kusal Perera has launched into New Zealand 💥#CWC23 #NZvSL pic.twitter.com/uLml9putxY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)