आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ जवळपास सज्ज झाले आहेत, मात्र सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम (Mohammad Wasim Jnr) जखमी झाला आहे. सराव सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आधीच संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. संघातील त्याच्या अनुपस्थितीने पाकिस्तानी खेळाडूंचे मनोधैर्य खचले आहे. आता मोहम्मद वसीमलाही वगळल्याने पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी कमकुवत होऊ शकते. मोहम्मद वसीम दुखापतग्रस्त असून तो भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो, असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. मात्र, पीसीबीकडून याबाबत कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. त्याचवेळी संघाबाहेर असतानाही शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान संघासह दुबई गाठून भारतीय खेळाडूंची भेट घेतली.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)