इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 36 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मागील सलग चार सामन्यांत पराभूत होत आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोन सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या मोसमातील सातपैकी चार सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सने सात सामन्यांत फक्त दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. सलामीवीर जेसन रॉय 56 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्कोअर 88/2.
Cleaned up 🔥🎯
A leg-stump yorker by Vijaykumar Vyshak to put an end to Jason Roy's innings 👌🏻👌🏻#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/fID5xANmL0
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)