ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतच्या प्रवासात, स्फोटक फलंदाज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ निर्धारित 17.1 षटकांत अवघ्या 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक 19 धावा केल्या. टीम इंडियाकडून टीटा साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अंतिम सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 20 षटकात 69 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला दुसरा मोठा झटका बसला.
ICC U19 WOMEN'S WC. WICKET! 3.4: Shweta Sehrawat 5(6) ct Hannah Baker b Grace Scrivens, India Women U19 20/2 https://t.co/89XmsIML0g #INDvENG #U19T20WorldCup #Final
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)