इंडियन प्रीमियर लीग 2024 ची (IPL 2024) तयारी पूर्ण झाली आहे. हा लिलाव दुबईत (Dubai) दुपारी एक वाजता सुरू झाला आहे. आयपीएल 2024 च्या लिलावात 333 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ 77 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. परदेशी खेळाडूंसाठी 30 स्लॉट राखीव आहेत. लिलावाच्या यादीत अनेक बड्या खेळाडूंचाही समावेश आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला आरसीबीने 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले. अल्झारीची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
RCB's first buy of this #IPLAuction is Alzarri Joseph, and it's a big one!https://t.co/dLyU9HXJoP | #IPL2024 pic.twitter.com/M17936gsFx
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)