India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्याचबरोबर हा सामना बांगलादेशसाठीही खूप महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशला दुसरा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 29/2
2ND Test. WICKET! 12.1: Shadman Islam 24(36) lbw Akash Deep, Bangladesh 29/2 https://t.co/VYXVdyNHMN #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)