IND W vs SA W 1st ODI: भारतीय महिला क्रिकेट संघाने 3 वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव (IND Beat SA) केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 143 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 50 षटकात 8 विकेट गमावत 265 धावा केल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर 266 धावांचे लक्ष्य होते, परंतु ते 37.4 षटकात केवळ 122 धावांवरच गारद झाले. या विजयानंतर भारतीय संघ 3 वनडे मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 19 जून रोजी होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)