ECS Switzerland T10: अफगाणिस्तानचा 19 वर्षीय फलंदाज आरिफ संगरने (Arif Sangar) आपल्या तुफानी फलंदाजीने दहशत निर्माण केली आहे. आरिफने युरोपियन क्रिकेट मालिकेतील T10 सामन्यात केवळ 29 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. आरिफने 35 चेंडूत 118 धावांच्या खेळीत एकूण 2 चौकार आणि 17 षटकार ठोकले. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या ECS स्वित्झर्लंड T10 लीग सामन्यात, पॉवर सीसी विरुद्ध पख्तून जाल्मीकडून खेळत असलेल्या आरिफ संगरने 337.14 च्या स्ट्राइक रेटने खेळताना 17 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 118 धावा केल्या. यादरम्यान आरिफने केवळ 29 चेंडूत शतक झळकावून नवा इतिहास रचला. आरिफने एका षटकात 29 धावा दिल्या. आरिफने 97 धावांवर खेळत षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. आरिफच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर प्रथम खेळताना त्याच्या संघ पख्तुन जाल्मीने 10 षटकात 3 गडी गमावून 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात पॉवर सीसीचा संघ 103 धावांत सर्वबाद झाला.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)