Team India World Cup 2023 Jersey: पुढील महिन्यापासून मायदेशात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी Adidas ने टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. प्रसिद्ध भारतीय गायक रफ्तार यांनी गायलेल्या ‘3 का ड्रीम’ या गाण्याद्वारे बहुप्रतिक्षित जर्सी रिलीज करण्यात आली. ‘ 3 का ड्रिम ’ हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे जे त्यांच्या संघाला 1983 आणि 2011 नंतर तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकताना पाहण्याचे स्वप्न पाहतात. Adidas ने भारतात खेळल्या जाणार्या क्रिकेटचा उत्सव साजरा करण्यासाठी मेन इन ब्लू जर्सीमध्ये सुधारणा केली आहे. त्यांनी खांद्यावरील तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी चमकदार तिरंगा लावला आहे. BCCI लोगोमध्ये आता छातीच्या डाव्या बाजूला दोन तारे आहेत, जे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतीक आहे.
1983 ignited the spark.
2011 brought in glory.
2023 marks the beginning of #3KaDream. pic.twitter.com/1eA0mRiosV
— adidas (@adidas) September 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)