PAK Squad Announced for NZ T20I Series: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 18 एप्रिलपासून न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मोहम्मद आमिर (Mohammad Amir) आणि इमाद वसीम (Imad Wasim) यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांनीही नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर यू-टर्न घेतला होता. वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि अष्टपैलू इमाद वसीम यांचा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला आहे. यासोबतच हे दोन्ही खेळाडू 2024 मध्ये जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळणार असल्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

पाहा संघ

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 साठी पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, मोहम्मद अमीर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उसामा मीर, उस्मान खान आणि जमान खान.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)