भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबाद येथे सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला होता. सुरुवातीच्या धक्क्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहली क्रीजवर आहे. डावाच्या 14व्या षटकात एका चाहत्याने प्रवेश केला आणि या वेळी माऊच थांबला. हा विराट कोहलाचा चाहता होता जो क्रिजवर आला आणि त्याने विराटला मिठी मारायला सुरुवात केली. या घटनेनंतर विराट कोहली आणि या चाहत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या चाहत्याच्या हातात पॅलेस्टाईनचा ध्वजही होता आणि त्याच्या टी-शर्टच्या मागच्या बाजूला फ्री पॅलेस्टाईनही लिहिलेलं होतं. ही व्यक्ती मैदानात आल्यावर विराट आणि राहुलने त्याला ढकलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी येऊन या व्यक्तीला मैदातुन बाहेर काढले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)