रविवार, 30 एप्रिल, भारत आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) 36 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी त्याच्या हैद्राबादमधील चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी 60 फूट मोठा कट-आउट लावला आहे. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगात भारतीय कर्णधाराच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. 2007 मध्ये पदार्पण केल्यापासून उजव्या हाताच्या फलंदाजाने अनेक विक्रम केले आहेत. हैदराबादमध्ये त्याच्या 36व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान 'हिटमॅन'ची क्रेझ जोरात होती. मुंबई इंडियन्सने हैदराबादच्या चाहत्यांनी तयार केलेल्या 60 फूट उंच कट-आउटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)