Abhishek Porel: आयपीएल 2024 चा (IPL 2024) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (DC vs PBKS) यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेलच्या झंझावाती फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकांत 174 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या 21 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलने स्फोटक शॉट्स मारले. त्याने हर्षल पटेलच्या एका षटकात चौकार आणि षटकार मारत 25 धावा केल्या. (हे देखील वाचा: KKR vs SRH, IPL 2024 3rd Match: आज हाय व्होल्टेज सामन्यात कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)