Virat Kohli yo-yo Test: आशिया कपपूर्वी विराटने यो-यो टेस्टमध्ये 17.2 गुण मिळवले आहे. यो-यो टेस्ट (Virat Kohli yo-yo Test) हे भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी फिटनेसचे माप आहे. यामध्ये खेळाडूंना ठराविक वेळेत धावून अंतर कापावे लागते. कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. कोहलीने सोशल मीडियावर ज्या पद्धतीने हा आनंद व्यक्त केला आहे, त्यावरून तो त्याच्या फिटनेसबाबत किती गंभीर आहे, हेच कळते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी विराटला विश्रांती देण्यात आली होती. भारताचा स्टार फलंदाज आता 2 सप्टेंबरला आशिया चषकात पाकिस्तानशी भिडणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)