Australia Men's National Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, गाबा कसोटी चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात केवळ 17 चेंडू खेळता आले आणि त्यानंतर पावसाने दणका दिला. अशाप्रकारे आज तिसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला आहे. रवींद्र जडेजा 52 आणि नितीश रेड्डी 9 धावांवर नाबाद आहे. भारताचा स्कोर 180/6 आहे.
Fifties from KL Rahul and Ravindra Jadeja have given the team a fighting chance to save the Gabba Test 💪
Rain interrupts play once again in Brisbane, with India 66 runs away from avoiding the follow on ➡️ https://t.co/PupB4ooHCb #AUSvIND pic.twitter.com/Z4iCDvUp7T
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)