आज आयपीएल 2023 हंगामातील 29 वा सामना आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. एमएस धोनीने चेपॉकमध्ये नाणेफेक जिंकली आहे. धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, धोनीने प्लेइंग इलेव्हनबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्याचवेळी हैदराबादच्या कर्णधाराने 16 खेळाडूंच्या संघात कोणताही बदल केला नसल्याचे सांगितले आहे. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 5 सामन्यात 3 विजय नोंदवले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादला तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त 2 विजय मिळाले आहेत.
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss and elect to field first against @SunRisers.
Follow the match ▶️ https://t.co/0NT6FhLcqA#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/OA4x0K9mVB
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)