UPI Payment For Female Dancer Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ खूपचं मजेशीर असतात. सध्या ट्विटरवर @HasnaZaruriHai या यूजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला डान्सर स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. तसेच स्टेजच्या खाली एक तरुण तिच्याबरोबर ठेका ठरताना दिसत आहे. यावेळी तो या महिला डान्सला UPI पेमेंट करताना दिसत आहे. महिला या तरुणाला आपले स्कॅनर दाखवते. त्यानंतर हा तरुण या महिलेला ऑनलाईन पैसे पाठवतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. यातील एका यूजरने म्हटलं आहे, 'आता याचे पेमेंटही डिजिटल पद्धतीने होऊ लागले आहे. अजून किती विकास हवा?' सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

डान्सर महिला तिच्या नृत्यासाठी आपल्यावर रोख रकमेचा वर्षाव करण्याऐवजी तरुणाला UPI पेमेंटसाठी QR कोड देत आहे. विशेष म्हणजे हा तरुण आनंदाने कोड स्कॅन करताना आणि UPI वापरून तिला पैसे देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. चलनी नोटांचा वर्षाव करणे किंवा त्यांचा अनादर करणे हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)