Delhi Metro Viral Video: दिल्लीची लाइफलाइन म्हटली जाणारी दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते. कधी आपल्या किफायतशीर प्रवासामुळे तर कधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमुळे दिल्ली मेट्रो चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा मेट्रोच्या आतून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा चालत्या ट्रेनमध्ये नाचताना दिसत आहे. दिल्ली मेट्रोशी संबंधित एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एक मुलगा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, तर इतर लोक त्या तरुणाचा डान्सचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. दिल्ली मेट्रोवरून असा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक नाचताना, सीटसाठी एकमेकांशी भांडताना दिसत होते. यासोबतच अनेक जोडपी चालत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करतानाही व्हिडिओमध्ये दिसून आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by DU Updates (@duupdates)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)