Viral Video: इंटरनेटला आणखी एक अतरंगी खाद्यपदार्थ सापडला आहे आणि तो म्हणजे 'तंदूरी चिकन आइस्क्रीम' हा आहे. या अगोदर आमरस डोसा, चॉकलेट उसाचा रस आणि असे अनेक खाद्यपदार्थ इंटरनेटवर नेटिझन्सला चालना देण्यासाठी समोर आल्या आहेत, 'तंदूरी चिकन आइस्क्रीम' ही लोकांना थक्क करणारी नॉनव्हेज रेसिपी आहे. सध्या उन्हाळा आहे आणि तुम्ही आईस्क्रीम खात असाल, पण त्यात चिकन असेल तर काय? मोहम्मद फ्युचरवाला नावाच्या वापरकर्त्याने या विचित्र पदार्थाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता आणि त्याने क्लिपला कॅप्शन दिले होते: "प्रोटीन समृद्ध तंदूरी चिकन आइस्क्रीम सर्वांसाठी सादर करत आहे." हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
पाहा व्हिडीओ:
Found a perfect hack to beat the summer heat
Presenting protein rich tandoori chicken ice cream for one and all
🥵🥵🥵 pic.twitter.com/d3m97kC2YC
— Mohammed Futurewala (@MFuturewala) April 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)