Viral Video: अनेकदा कुत्रांच्या संबधित  सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतो. असं सांगितले जात की, कुत्रा हा प्राणी इमानदार तर असतोच सोबत तो आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करतो. भटक्या कुत्रांना देखील आपल्या आजू बाजूच्या परिसरातील लोकांचे संरक्षण कसे करायचे हे माहित असतं. परिसरात राखण करण्यासाठी कुत्रा नेहमी सर्तक राहतो. तसच काहीशी एक घटना घडली आहे. सद्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका मुलीचे अपहरण होण्यापासून कुत्रा तीचे रक्षण करत आहे. शाळेतून घरी परतत असताना रस्त्यावरून मागून एक कार येते. आणि मुलीच्या पुढ्यात येवून थांबते. कारचा दरवाजा उघडताच, ती मुलगी घाबरते. हे पाहून भटके कुत्रे सर्तक होतात. आणि जोरजोरत भुकंण्यास सुरुवात करतात. कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फसार होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)