उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये पाऊस नसल्यामुळे त्रस्त झालेले लोक पावसाच्या आगमनासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत आहेत. कोणी हवन-पूजा करत आहे, तर कोणी चिखलाने आंघोळ करत आहे. आता गोरखपूर जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून बेडकांचे लग्न लावण्यात आले आहे. इथल्या कालीबारी मंदिरात बेडूक आणि बेडकीचे लग्न पूर्ण विधीपूर्वक पार पडले. हिंदू महासंघातर्फे मंगळवारी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी बेडकांचा प्रतिकात्मक विवाह करण्यात आला. यादरम्यान तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

याबाबत संयोजक राधाकांत वर्मा सांगतात, ‘हा एक महत्त्वाचा विधी आहे. हे लग्न लावून मी देवाला प्रार्थना केली आहे आणि मला आशा आहे की पाऊस नक्की पडेल.’ हवामान तज्ज्ञांच्या मते, साधारणत: 1 ते 10 जुलै दरम्यान या ठिकाणी 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो, मात्र यंदा जिल्ह्यात केवळ 11 मिमी पाऊस झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)