विवाह सोहळ्यांमध्ये पाहुण्यांची सरभराई आणि त्यांची सेवा नेहमीच पाहायला मिळते. पाहुणचारामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी अनेक विवाहांमध्ये भुपे पद्धतही अवलंबण्यात येते. पण, एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. ज्या लग्नात चक्क पाहुणे मंडळींनाच जेवण बनविण्यासाठी स्वयंपाकघरात काम करावे लागत आहे. लग्नसोहळ्यासाठी नटून-थटून आलेल्या लोकांना चक्क रोटी, पापड भाजताना पाहणे भलतेच मनोरंजक ठरत आहे. शेफची भूमिका बजावताना पाहूणेही हास्यविनोदात रमलेले पाहायला मिळत आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)