आपल्या सर्व देशवासियांसाठी 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन हा एक खास दिवस आहे. यंदा देशात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा होत असून, त्यासाठी देशभरात मोठ्या उत्साहात जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' मोहीम राबवली जात आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे ध्येय आहे. आजकाल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत, या पार्श्वभुमीवर एक व्हिडीओ समोर आला आहे जो एका तिरंगी धबधब्याचा आहे. म्हणजेच या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याला तिरंगी रंग आला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. हा व्हिडिओ व्हाट्सएप, ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)