Viral Video:  भारतीय रेल्वे ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात रेल्वे ट्रेनच्या काचा फोडल्या आहेत.लोक विना तिकीट प्रवास करत असल्यामुळे त्या व्यक्तीला ट्रेनमध्ये चढता येत नव्हते. त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ट्रेन खचाखच भरलेली असून तिचे दरवाजे आतून बंद असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ती व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते पण अपयशी ठरते. रागाच्या भरात त्याने दगडाने दरवाजाची काच फोडली. आत बसलेले प्रवासी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि ट्रेन पूर्ण भरली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. (हेही वाचा- काय सांगता? फक्त बिकिनी घालून महिलेने केला दिल्लीच्या बसमधून प्रवास)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)