उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये कुत्र्यासोबत अतिशय क्रूर वागणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथल्या सरूरपूर गावातील बिंद्रपाल नावाच्या तरुणाने कुत्र्याचे दोन्ही पाय पकडून त्याला हवेत गोल-गोल फिरवले. सुमारे 2 मिनिटे हा तरुण कुत्र्याला शक्तीमानप्रमाणे हवेत फिरवत राहिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शक्तीमान मालिकेचे शीर्षक गीतही ऐकायला येत आहे. बिंद्रपालनेच हा व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाविरुद्ध सरूरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय वन संवर्धन कायदा, 1971 मध्ये प्राण्यांची शिकार करणे, त्यांच्यासोबत स्टंटबाजी करणे, कोणत्याही प्राण्याची निर्घृण हत्या करणे हे जघन्य गुन्हे आहेत. यामध्ये आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी, 10 हजार रुपये आर्थिक दंडाची तरतूद आहे. (हेही वाचा: Yoga Day 2023: ITBP श्वान पथकातील कुत्र्याचाही जवानांसोबत उधमपूर मध्ये योगाभ्यास; पहा त्याच्या कसरतींचा क्यूट अंदाज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)