सध्या सोशल मिडियावर विविध प्रकारचे लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही भावूक करतात, तर काही व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे हसू आवरू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. एका लग्नातील हा व्हिडिओ असून, ज्यामध्ये दिसत आहे की काहीतरी भन्नाट करायच्या इराद्याने नवरा-नवरी चक्क जेसीबीमध्ये बसले आहेत. परंतु जेसीबीमध्ये बसून आपले लग्न एन्जॉय करत असतानाच ते धपकन खाली जमिनीवर पडतात. कदाचित जेसीबी ऑपरेट करणारी व्यक्ती ही गोष्ट विसरली असेल की, ती एका लग्नामध्ये हा जेसीबी चालवत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)