IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) तिच्या डान्स व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) आजच्या मॅचपूर्वी रॉयल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये धनश्री संघाचा युवा फलंदाज रियान पराग (Riyan Parag) सोबत थिरकताना दिसत आहे. यावर्षी 14 एप्रिल 2022 रोजी बोहाग बिहू (Bohag Bihu) साजरा केला जात आहे. हा सण आसाममध्ये वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो आणि उत्सवाचा एक भाग म्हणून, आसामचे (Assam) लोक पारंपारिक नृत्य करतात. रियानने या डान्सच्या काही स्टेप्सवर धनश्रीला आपल्या इशाऱ्यावर नाचवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)