सापांच्या विविध प्रजातींपैकी बऱ्याच इतक्या धोकादायक आहेत की, त्यांच्या विषाचा एक थेंब देखील मनुष्याला मारण्यासाठी पुरेसा आहे. अशात जवळजवळ सर्वजणच साप-अजगर अशा प्राण्यांपासून दूर राहणेच पसंत करतात. आता एका महाकाय अजगराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका 22 वर्षांच्या मुलाने 19 फूट लांबीचा महाकाय अजगर धरलेला दिसत आहे. माहितीनुसार, हा व्हिडिओ अमेरिकेमधील आहे, जिथे 22 वर्षीय जेक व्हॅलेरीने फ्लोरिडातील झुडूपातून अजगराची शेपटी खेचत त्याला ओढले. त्यानंतर अजगराने आपले तोंड उघडून त्याच्यावर वार केला, परंतु तेव्हा या धाडसी मुलाने अजगराचा गळा पकडला. व्हायरल व्हिडिओमध्ये हा मुलगा अजगराचा गळा पकडताना दिसत आहे. त्यानंतर हा अजगर मुलाच्या अंगाला वेटोळे घालू लागतो व नंतर रेस्क्यू टीम मुलाची अजगराच्या तावडीतून सुटका करते. (हेही वाचा: Snake Snake: दुचाकीमध्ये अडकलेल्या सापाला जीवदान, पाहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)