नागपूर येथे सीमा ढोसे नामक महिलेच्या दुचाकीमध्ये साप आढळून आला आहे. सीमा ढोसे या बँक कलेक्शनचे काम करतात. त्या कलेक्शनसाठी गेल्या असता त्यांना आपल्या दुचाकीच्या हेडलाईटमध्ये सापाचे शेपूट पाहायाला मिळाले. त्यांनी तातडीने गाडी थांबवली आणि सर्पमित्रांशी संपर्क केला. सर्पमित्रांनी मदत आणि बचावकार्य राबवत सापाला बाहेर काढले. नंतर त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे प्राणी मानवी वस्तीमध्ये येतात. कदाचित सापाला जमीन आणि वस्तू यातील फरक लक्षात न आल्याने किंवा घाबरलेल्या अवस्थेत आश्रय शोधताना दुचाकीच्या हेडलाईटमध्ये गेला असावा असा तर्क लावला जात आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)