रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अवघे जग चिंतेत असताना काही अफवाही मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत, जसे की युक्रेनमधील लष्करी कारवायांमुळे विविध देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर काही वेळातच 'पॉर्नहब' या प्रौढांसाठी असलेल्या वेबसाइटने रशियाविरुद्ध निर्बंध लादले आहेत. अशी अफवा आहे की रशियन वापरकर्त्यांना पॉर्नहबमध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे आणि जेव्हा ते साइटवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना युक्रेनियन झेंडे दाखवले जातात. सोशल मीडियावर याबाबत व्हायरल झालेल्या पोस्टबाबत जेव्हा पुष्टी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वास्तव असे पुढे आले की, व्हायरल पोस्ट खोटी आहे. असे कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आले नाहीत.
According to the false rumor, Russian users who attempted to access Pornhub were blocked from its content and instead shown the Ukrainian flag. https://t.co/V4mPKmF6iL
— snopes.com (@snopes) February 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)