जाती-धर्मांच्या रीती-रिवाजांनुसार, शाही सोहळ्यांचे अनेक नमुने आपण समोर येत असतात. विवाह हा एक संस्कार असला तरीही आजकाल त्याचा सोहळा केला जातो. एका पाकिस्तानी वधूचा असाच एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. ज्यामध्ये या वधूची 70 किलो सोन्याच्या विटांसोबत  तुला करण्यात आली आहे. तराजूच्या एका पारड्यात वधूला बसवून दुसर्‍या पारड्यात सोन्याच्या वीटा टाकल्या जात आहे. हा लग्न सोहळा दुबईमध्ये संपन्न झाला आहे. या वधूचे पिता व्यापारी असल्याचं  सांगितलं जात आहे.

पहा विडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)