Navi Mumbai: पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी नाटकीयरित्या पळून गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नायजेरियन नागरिक असणाऱ्या या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्जच्या छाप्यात पकडले होते. उलवे येथील सेक्टर 24 परिसरात ड्रग्ज माफियांवर कारवाई म्हणून हा छापा टाकण्यात आला. ट्विटर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीला पकडलेले दिसत आहे. ते पोलिस व्हॅनच्या दिशेने चालू लागताच, आरोपी कसा तरी पोलिसांची पकड सोडतो आणि पोलिसांपासून दूर पळून जातो. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस वेळ वाया न घालवता आरोपीचा पाठलाग करतात. मात्र त्यांच्या प्रयत्नात एक पोलिस कर्मचारी जमिनीवर पडतो. आरोपीला पकडण्यासाठी इतर पोलिस कर्मचारी वेगवेगळ्या दिशेने धावतात. मात्र, पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले की नाही, याबाबत कोणतेही वृत्त नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)