Viral Video: दुबईतील 'मोस्ट नोबल नंबर्स'च्या लिलावात कारची नंबर प्लेट P7 विक्रमी 55 दशलक्ष दिरहम (सुमारे 1,22,61,44,700 रुपये) मध्ये विकली गेली. शनिवारी रात्री झालेल्या लिलावात 15 दशलक्ष दिरहमची बोली लागली. काही सेकंदातच बोलीने 30 दशलक्ष दिरहम पार केले. एका क्षणी 35 दशलक्ष दिरहमपर्यंत पोहोचल्यानंतर काही काळासाठी बोली थांबली. टेलीग्राम अॅपचे संस्थापक आणि मालक फ्रेंच एमिराती व्यापारी पावेल व्हॅलेरिविच दुरोव यांनी ही बोली लावली होती. पुन्हा एकदा बोली झपाट्याने वाढून 55 दशलक्ष दिरहमपर्यंत पोहोचली. पॅनल सेव्हनने ही बोली लावली होती, ज्यांनी निनावी राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जुमेराह येथील फोर सीझन हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला. लिलावातून सुमारे 100 दशलक्ष दिरहम ($27 दशलक्ष) जमा झाले. (हेही वाचा - Most Followed Facebook Pages: Facebook App ठरले फेसबुकवरील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले पेज, दुसऱ्या क्रमांकावर Cristiano Ronaldo चा दबदबा, वाचा संपूर्ण यादी)
Watch: A new record was set last night, as car number plate P7 sold for a whopping Dh55 million at an auction in Dubai https://t.co/9bLBrLKedv pic.twitter.com/xtFG4FrDEZ
— Khaleej Times (@khaleejtimes) April 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)