विमानात एक प्रवासी तिन्ही सीट्स वर पहुडत धुम्रपान करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची केंद्रीय उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दखल घेत अशा कृत्यांना सहन केले जाणार नाही असं सांगत चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या व्यक्तीचं नाव Balvinder Kataria असून तो 23 जानेवारीला दुबई ते दिल्ली असा स्पाईस जेट विमानाने आला होता. त्याचा वायरल व्हिडिओ सोशल मिडीयावरून हटवण्यात आला आहे. तसेच यापूर्वीच त्याच्यावर aviation security ने कारवाई केल्याची माहिती Bureau of Civil Aviation Security ने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)