पेशाने डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीचे धक्कादायक कृत्य पुढे आले आहे. हा व्यक्ती आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला घेऊन गेला होता. दरम्यान, त्याच्या कुत्र्याने रस्त्यावर शौच केले. या वेळी एका नागरिकाने या डॉक्टर व्यक्तीस जाब विचारला. नागरिकाने जाब विचारताच या डॉक्टरने त्याला काठीने मारहाण सुरु केली. तसेच, नागरिकाच्या अंगावरही कुत्रा सोडला. डॉक्टरने केलेली मारहाण आणि कुत्र्याने घेतलेला चावा. यामुळे संबंधीत नागरिक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)