कलाकाराचं डोकं कधी, कुठे आणि कसं चालेल सांगता येत नाही. अशा कलाकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात. व्हँलेंटाईन डे निमित्ताने असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ एक्स हँडलवर शेअर करत हॅप्पी व्हॅलेंटाईन असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती म्हैस घेऊन निघाला आहे. पण त्याने त्या म्हैशीवर एका तरुणीचे चित्र काढले आहे. तिचे पुढचे पाय अशा बेताने रंगवले आहेत की, चालताना जणू एखादी तरुणीच चालली आहे असे वाटावे. म्हैशीच्या पाठिमागे त्याने एका तरुणाचे चित्र काढले आहे. त्याने म्हैशीचे पाय अशा बेताने रंगवले आहेत की, जणून एखादा तरुणच तरुणीचा पिछा करतो आहे. या तरुणाच्या हातात एक पुष्पगुच्छही आहे. पाहायला अत्यंत सुंदर असा हा व्हिडिओ आपणही येथे पाहू शका.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)