केंद्रीय वीज मंत्रालयाच्या नावे बनावट पत्र सोशल मीडीयात वायरल होत आहे. यामध्ये गेल्या महिन्याचं वीज बिल भरलं नसेल तर कनेक्शन तोडलं जाईल, असा संदेश देण्यात आला आहे. परंतू पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरून सोशल मीडीयात वायरल होत असलेलं हे पत्र बनावट असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये.
पहा ट्वीट
गेल्या महिन्याचं वीज बिल भरलं नसेल तर कनेक्शन तोडलं जाईल, असा संदेश सध्या समाजमाध्यमांवर दाखविला जात आहे. पंरतु हा संदेश आणि केंद्रीय वीज मंत्रालयाचं पत्र बनावट असल्याचं पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्ट करण्यात आलं आहे. @PIBFactCheck @MinOfPower pic.twitter.com/Fju7kWgZFT
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)