भारतामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त प्रमाणात सेवन केली जाणारी गोष्ट म्हणजे चहा. गल्लीपासून ते मोठ-मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र चहा मिळतो. घरी येणाऱ्या पाहुण्यांचेही स्वागत चहाच्या कपानेच केले जाते. देशात चहा हे फक्त एक पेय नसून लोकांच्या जीवनाचा एक भाग, लोकांची भावना आहे. देशात चहा बनवण्याची सुद्धा एक ठराविक पद्धत आहे. परंतु गुजरातच्या सुरतमध्ये एका चहा विक्रेत्याने ज्या पद्धतीने चहावर अत्याचार केले आहेत, ते पाहून सोशल मिडियावर चित्र-विचित्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या चहाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चहावाले काका सर्वात आधी गरम दुधात आधी केळी टाकतात. मग चहापत्ती टाकतात. यानंतर, त्यामध्ये एक संपूर्ण चिकू आणि सफरचंद खिसून टाकले जाते. नंतर चहाला उकळी आली की तो गाळून सर्व्ह केला जातो. इतकी फळे घातल्यानंतर हा फ्रूट टी साधारण चहासारखाच दिसतो. पण, या चहाची चव चाखणे एखाद्या धोकादायक स्टंटपेक्षा कमी ठरणार नाही.
व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे की हा चहा 10 वर्षांहून अधिक काळापासून बनवला जात आहे आणि तो लोकांना प्यायला आवडतो.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)