मोदी सरकार कडून 8 नोव्हेंबर पासून 65 हजार रूपये आणि 9500 रूपयांच्या वस्तू मोफत मिळणार असल्याचा  खोटा  दावा वायरल झाला होता. युट्युब वर 'Daily Study' या युट्युब चॅनलवर एका व्हिडिओच्या माध्यमातून हा खोटा दावा करण्यात आला होता. पीआयबीने या दाव्याच्या दखल घेत अशाप्रकारे कोणतीही घोषणा सरकार कडून करण्यात आली नसल्याचा आणि हा दावा खोटा असल्याचं X  वर पोस्ट करत म्हटलं आहे. सोशल मीडीयात अनेक बनावट दाव्यांची पोलखोल पीआयबी फॅक्ट चेक वर केली जाते. सरकारी सुत्रांकडून खात्री करून घेतल्याशिवाय सरकारी योजनांच्या  कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)