सध्या सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, 1990 ते 2021 दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकार मोठी रक्कम देणार आहे. या मेसेजमध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नावाने दावा केला जात आहे की, अशा कर्मचाऱ्यांना मंत्रालयाकडून 1,55,000 रुपये मिळवण्याचा हक्क आहे. आता या व्हायरल मेसेजची सत्यता सरकारी माहिती एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या वतीने ट्विट करून सांगण्यात आली आहे. हा मेसेज खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. सरकारने असे कोणतेही फायदे जाहीर केलेले नाहीत, असे समोर आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)