Gurugram Shocker: गुरुग्राममध्ये सोमवारी एका तरुणाने पालम विहारमध्ये भरदिवसा एका तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 19 वर्षीय पीडितेच्या आईने आरोपीला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु, ती अयशस्वी ठरली. गुन्ह्याच्या ठिकाणी इतरही लोक उपस्थित होते पण त्यांच्यापैकी कोणीही आरोपीला रोखण्याचे धाडस दाखवू शकले नाही. पीडितेच्या नातेवाइकांनी अखेर हतबल होऊन मारेकऱ्याला पकडण्यात यश मिळविले. राजकुमार असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी पालम विहार येथून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. (हेही वाचा - Chappal Thieves: दोन चप्पल चोरांना कोर्टाने ठोठावला 7 वर्षांचा कारावास आणि 41 हजार रुपये दंड, हरिणातील रेवडी जिल्ह्यातील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)