Earthquake In Nepal: देशात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळची राजधानी काठमांडू आणि पोखरा दरम्यानच्या धडिंगमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, हा 5.3 तीव्रतेचा भूकंप होता, जो रविवारी सकाळी 7:24 मिनिटे 20 सेकंदावर आला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेपाळमधील काठमांडू खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर तेथील रहिवासी घराबाहेर धाव घेताना दिसत आहेत. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)