चीनमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा उंच इमारतीच्या कठड्यावर खेळताना दिसत आहे. चीनमधील पोलिसांनी पालकांना त्यांची मुले उंच इमारतींमध्ये खेळत असताना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. खिडकीच्या कठड्यावर खेळणाऱ्या मुलाचे हे फुटेजदेखील पोलिसांनी शेअर केले आहे. हेनानच्या झेंगझोऊ येथील एका शेजाऱ्याने हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, लपाछपी खेळताना मुलगा इमारतीच्या खिडकीच्या बाहेर जाऊन लपतो. हा व्हिडिओ शेअर करत पोलीस लिहितात, ‘चांगले शेजारी व्हा आणि पालकांना त्यांच्या मुलांची चांगली काळजी घेण्याची आठवण करून द्या.’ याआधी एका महिलेचा उंच इमारतीच्या कठड्यावर खिडक्या साफ करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)