गुलाबी थंडीत प्रत्येक युगुल एकमेकांच्या बाहुपाशातील ऊबेची अपेक्षा करतो. या मोसमात कामुकता आणि उत्तेजनेचा स्तर वाढतो. अशात जर का तुमच्या गर्लफ्रेंडने या थंडीच्या वातावरणात ब्रेकअप करायची इच्छा व्यक्त केली तर? भलेही तुम्हालाही तिच्यासोबत ब्रेकअप करायचे असेल, पण त्यावेळी एक वाक्य तुमच्या ओठावर येईल ते म्हणाले- ‘थंडी गेल्यावर ब्रेकअप करू.’ कारण तुम्हाला या थंडीत तिच्या शरीराची उब हवी असते. याचबाबत सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘जेला कळाल तेलाच समजलं’ असे याचे Caption आहे, ज्याद्वारे थंडीमधील गर्लफ्रेंडचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. या भावानेही थंडीनंतर ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. काही लोकांना ही थंडी रुक्ष वाटू शकते तर काहींना ती गुलाबी, आल्हाददायक, हवीहवीशी वाटते. थंडीच्या दिवसांत आपल्या जोडीदारासोबत बिछाण्यात पडून राहण्याचा आनंद काही औरच आहे. थंडीचा मोसम हा रोमान्सचा मोसम असतो. बाहेरील तापमान घटताच अंतर्गत तापमान वाढते आणि आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची इच्छा तीव्र होते, म्हणूनच सहसा लोकं थंडीमध्ये ब्रेकअप करत नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avduth Kulkarni (@comedyman_avduth)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)