नात्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक बातम्या आपण पाहात असतो. ऐकत असतो. अनेकदा दुरावा आल्याने दोघेही किंवा दोघांपैकी एक खूपच दु:खी झालेलेही आपण पाहिले असेल. पण, सोशल मीडियावर एक दुरावा म्हणजेच ब्रेकअप भलताच व्हायरल झाला आहे. यामध्ये एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी चक्क पत्र लिहीले आहे. या पत्रातील मजकूर पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. आणि असे कोणी करते का? असेही म्हणाल. पण, असे घडले आहे खरे. प्रेयसीने या पत्राचे आणि त्याला अनुसरुन झालेल्या संवादाचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)