जगात अशा अनेक मोठ-मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांच्या मुलाखती खूप अवघड समजल्या जातात. अशा कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लोकांना मुलाखतीच्या अनेक फेऱ्या पार कराव्या लागतात, त्यांनतर त्यांची निवड होते. गुगल ही अशीच एक कंपनी समजली जाते, जिथे नोकरी मिळवणे कठीण आहे. परंतु आता बेंगळूरूमध्ये कंपन्यांचे कर्मचारी होण्यापेक्षा भाडेकरू होणे कठीण झाले आहे. इथे भलेही तुम्ही कंपन्यांच्या मुलाखतीच्या अनेक फेऱ्या पार पाडून नोकरी मिळवू शकता मात्र, घरमालकाकडून घेण्यात येणारी मुलाखत उत्तीर्ण होणे कठीण झाले आहे.

अलीकडेच एका व्यक्तीने लिंक्डइन या सोशल मीडिया साइटवर आपला अनुभव शेअर केला आहे. रिपू दमन भदोरिया असे या व्यक्तीचे नाव असून, तो गुगलमध्ये काम करतो. नुकतेच तो सिएटलहून बंगलोरला शिफ्ट झाला आहे. इथे त्याला भाड्याने घर घ्यायचे होते व त्यासाठी घरमालक त्याची मुलाखत घेणार होता. रिपूने लिंक्डइनवर सांगितले की, प्रथमच तो एखाद्या मुलाखतीत अयशस्वी ठरला होता व ती मुलाखत होती भाडेकरूची मुलाखत. रिपू म्हणतो त्याच्यासाठी गुगलची मुलाखत देणे सोपे होते, परंतु घरमालकाची मुलाखत अवघड होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)